आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss Universe Lara Dutta Is Happy With The Tennis Star

PHOTOS : टेनिस स्टारची निवड करुन आनंदात आहे माजी मिस युनिव्हर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 एप्रिल 1978 रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये लारा दत्ताचा जन्म झाला. 2000 साली मिस युनिव्हर्सचा किताब मिळवल्यानंतर तीन वर्षांनी लाराने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'अंदाज' हा तिचा पहिला सिनेमा होता. बिझनेसमॅन केली दोरजीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव अनेक अभिनेत्यांबरोबर जोडले गेले. लाराने मात्र आपल्या प्रेमप्रकरणाविषयी मौन बाळगणे पसंत केले.

काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात लाराची भेट महेश भूपतिबरोबर झाली. पहिले मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बरेच दिवस लाराने आपले हे प्रेमप्रकरण जगापासून लपवून ठेवले. त्यानंतर सप्टेंबर 2010 मध्ये दोघांनी साखरपूडा केला. त्यांच्या साखरपूड्याला क्रिडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज आले होते.

लग्नानंतर लाराने फिल्मी करिअरला रामराम ठोकला. लवकरच लारा आपली सेकंड इनिंग सुरु करणार असल्याची चर्चा आहे. सध्या ती आपला संपूर्ण वेळ पती आणि मुलीला देत आहे. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत लाराने सांगितले होते की, ती लग्नानंतर खूपच आनंदात आहे.

लाराची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...