आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मिस वर्ल्ड स्पर्धेत वान्यावर खिळून राहणार भारतीयांच्या नजरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑरडास (चीन) : जगातील सगळ्यात सुंदर तरुणी कोण ? याचा निर्णय आज (शनिवारी) चीनच्या ऑरडास शहरात होणार आहे. जगभरातील ११६ सौंदर्यवती मिस वर्ल्डच्या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. आता कुणाच्या शिरपेचात 'मिस वर्ल्ड 2012'चा ताज ठेवला जाणार हे शनिवारी रात्री पार पडणा-या शानदार सोहळ्यात निश्चित होणार आहे. मार्च महिन्यात 'फेमिना मिस वर्ल्ड इंडिया 2012' ठरलेली वान्या मिश्रा या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सगळ्या सौंदर्यवती इव्हिनिंग गाऊनपासून ते स्विमिंग कॉस्ट्युमपर्यंत वेगवेगळ्या पोशाखांमध्ये आपली जादू दाखवणार आहेत. शेवटी गेल्या वर्षीची 'मिस वर्ल्ड2011' व्हेनेजुएलाची इवियान सार्कोस विजेत्या तरुणीला ताज घालणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शुभेच्छा वान्याला देऊ शकता.