आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mithun Chakrabarty Suffered Huge Loss Due To Son

फ्लॉप झाला मुलाचा सिनेमा, मिथुन दांना बसला 15 कोटींचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगा महाअक्षयला हिंदी सिनेमात रीलाँच करण्यासाठी बनवलेल्या ‘एनिमी’ सिनेमामुळे मिथुन चक्रवर्तींवर पुन्हा एकदा अयशस्वी निर्मात्याचा ठपका लागला आहे.

डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती निर्मात्यांच्या रूपात दुसर्‍यांदाही अपयशी झाले आहेत. जून महिन्यात प्रदर्शित झालेला ‘एनिमी’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. त्यामुळे त्यांचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सुनील शेट्टी, महाअक्षय चक्रवर्ती, केके मेनन आणि मिथुन अभिनीत या सिनेमाने पहिल्या आठवड्यात देशभरात फक्त 1 कोटी 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला. दुसर्‍या आठवड्यापर्यंत तर हा मोठय़ा शहरातील पडद्यावरून गायब झाला. या अपयशाने लोकल वितरकांचे शेयर आणि पब्लिसिटीचा खर्चसुद्धा निघाला नाही. आठ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या सिनेमावर प्रचार आणि इतर कामासाठी सात कोटी रुपये खर्च झाला. म्हणजेच एकूण 15 कोटी खर्च केल्यानंतरही मिथुन दांच्या हाती बॉक्स ऑफिसकडून काही लागले नाही. सिनेमा फ्लॉप झाल्यामुळे त्याचे सॅटेलाइट अधिकारसुद्धा कमी किंमतीत विकावे लागेणार आहेत. 30 वर्षांपूर्वीसुद्धा मिथुन दांनी आपली प्रतिमा बदलण्यासाठी ‘बॉक्सर’ हा सिनेमा बनवला होता. मात्र हा सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर आपटल्यामुळे 80 च्या दशकात मिथुन दांना 20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.