बॉलिवूडचे एकेकाळचे सुपरस्टार मिथून चक्रवर्ती आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. जवळपास प्रत्येक दुस-या चौथ्या सिनेमात ते दिसतात. सध्या डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोच्या परीक्षकाची भूमिका ते साकारत आहेत.
मिथून दांची खास गोष्ट म्हणजे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अलीकडेच मिथून दा मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा महाक्षय आणि मुलगी दीशानी हजर होते.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मिथून दांची मुलगी दीशानी पहिल्यांदाच कॅमे-यासमोर आली होती. ब्लॅक टॉप आणि ग्रेस स्कर्टमध्ये ती सुंदर दिसली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच मीडियासमोर आलेल्या दीशानीची खास छायाचित्रे दाखवत आहोत.