आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mithun Chakraborty’s Movie Enemy Under The Rope Of Censor Board

नावातच सर्व काही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आशु त्रिखा दिग्दर्शित 'ऐनिमी' या सिनेमातील एका गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. या गाण्यात आधी कतरिना, करीना, बिपाशा आणि प्रियांका यांच्या नावांचा उल्लेख होता. त्यामुळे बोर्डाने यांची नावे काढून त्या जागी ‘मिस इंडिया’ आणि ‘मिस वर्ल्ड’ टाकण्याचा आदेश दिला आहे. अभिनेत्री मुमेत खान हिने या आयटम साँगवर नृत्य केले आहे. सेन्सॉरच्या मते, या चार लोकप्रिय तारका आहेत. गीत लिहिण्याआधी या चार तारकांकडून मौखिक एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) घ्यायला हवी होती.

मात्र दिग्दर्शक आशु त्रिखा रागावले आहेत. त्यांच्या मते, कतरिना, करीना, बिपाशा आणि प्रियांका माझ्यासाठी तारका नव्हेत तर फक्त नावे आहेत. अशा नावाच्या शंभर महिला आणि मुली असतील. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घ्यायला नको. माझ्या गाण्यात काहीच मानहानिकारक शब्द नाहीत.

शब्बीर अहमद यांनी लिहिलेले ओरिजनल गाणे असे आहे- ‘मुझको पटाने का है टेंशन, उडाये कोई रोकडा, उडाये पेन्शन, दिल के कदम जो मैं रख दूं, कतरिना को करीना को पानी कम चाय कम कर दू.. बिपाशा को प्रियांका को, पानी कम चाय कर दूं..’