आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये होते रफी साहेबांच्या कुटुंबाचे सलून, फकिराचे गाणे ऐकून घेतली गाण्याची प्रेरणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महंमद रफींच्या आवाजाशिवाय हिंदी सिनेमा संगीताची कल्पनासुध्दा केली जाऊ शकत नाही. त्यांच्या शास्त्रीय संगीताची एक अविस्मरणीय दुनिया आहे. डिसेंबरचा हा महिना आपल्याला रफीजींची आठवण करुन देतो. त्यांच्या भजन, गजल आणि इतर गाण्यांपासून ते त्यांनी गायलेले इतर भाषांमधील त्यांचे गाणे आजसुध्दा अमर असून लोकांना संगीताचा परिचय करुन देतात. सर्वात पहिले हे सांगणं गरजेचं आहे, की महंमद रफींनी त्यांच्या बालपणाच्या दिवसांत उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुर वहीद खान, फीरोज निजमी, यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम घेतली होती. मुंबईमध्ये आल्यानंतरसुध्दा त्यांचा शास्त्रीय संगीताचा सराव कायम चालू होता. आजच्या दिवशीच म्हणजे, 23 डिसेंबर 1924 मध्ये पंजाबच्या एका गावात कोटला सुल्तान सिंहमध्ये रफीजींचा जन्म झाला होता. आज या विशेष निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, रफीजींच्या जीवनातील तुम्हाला ठाऊक नसलेल्या काही खास गोष्टी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मोहम्मद रफींच्या काही खास गोष्टी...