उदिता गोस्वामी आणि मोहित सुरी थायलंडमध्ये आपला मधुचंद्र साजरा करत आहेत. सोबतच थायलंडमध्येच ‘द विलेन’ चित्रपटाची शूटिंगही होणार आहे. चित्रपटाचा नायक सिद्धार्थ मल्होत्रा आणि नायिका श्रद्धा कपूर आहे. सूत्रानुसार, ‘हा दौरा मोहितने आपले वैवाहिक जीवन वाचवण्यासाठी काढला आहे. मोहित आणि उदिता यांच्यात वाद सुरू होता.’ असे ऐकण्यात आले आहे की, शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर हीच त्यांच्या वादाचे कारण आहे. ‘आशिकी-2’च्या शूटिंगदरम्यान मोहित श्रद्धावर प्रेम करायला लागला आणि दोघांमधील जवळीक वाढत आहे, असा उदिताला संशय आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ही संपूर्ण भानगड आहे तरी काय?