आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother In Law Jaya Bachchan’S Most Precious Gift To Aishwarya Rai

REVEALED : सासूबाईंनी दिलेले खास गिफ्ट जीवापेक्षाही जास्त सांभाळून ठेवते सूनबाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला कोणते गिफ्ट सर्वाधिक पसंत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? हा प्रश्न जितका वेगळा आहे, तितकेच त्याचे उत्तरही खूपच विचित्र आहे. पती अभिषेककडून मिळालेल्या गिफ्ट्सपेक्षा सासूबाई अर्थातच जया बच्चन यांनी दिलेले गिफ्ट ऐश्वर्यासाठी खूप मोलाचे आहे. जया बच्चन यांनी ऐश्वर्याला चक्क लोखंडी बांगडी भेट म्हणून दिली आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले, की 'आराध्याच्या जन्मानंतर सासूबाईंनी भेट म्हणून मला लोखंडी बांगडी दिली होती. ही बांगडी मी स्वतःकडे खूप जपून ठेवली आहे.'

ऐश्वर्याने मुलाखतीत पुढे सांगितले, की 'मला ज्वेलरी खूप पसंत आहे. मात्र सिंपल पीसेसमधील ज्वेलरी मला जास्त आवडते. या सिंपल ज्वेलरीत माझ्या वेडिंग रिंगचाही समावेश आहे.'

ऐश्वर्याची वेडिंग रिंग मंगोलियन स्टाईलची असून ऐश्वर्या तिला खूप सांभाळून ठेवते. याशिवाय जया बच्चन यांनी दिलेली लोखंडी बांगडीसुद्धा ऐश्वर्याला खूप आवडते.

तसे तुम्हाला ठाऊकच असेल, की या ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यातील बाँडिंग खूप चांगली आहे. इवेंट्स आणि पार्टीजमध्ये या दोघींची बाँडिंग बघण्यासारखी असते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या सासु-सूनेची खास छायाचित्रे...