आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईची भीती दूर करण्यात गुंतला आमिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सत्यमेव जयते-2’च्या सादरीकरणामुळे आमिरच्या आई झीनत खान घाबरलेल्या आहेत. वाईट लोक आपल्य मुलाला नुकसान पोहोचवू शकतात, असे त्यांना वाटत आहे.
गेल्या वेळी कार्यक्रमाच्या अनेक मुद्दय़ांबाबत अनेक संघटना आणि लोकांनी आक्रमक पद्धतीने आमिर खानचा विरोध केला होता. तेव्हापासूनच आमिरच्या 80 वर्षांच्या आईच्या मनात काही तरी अनुचित घटना घडणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. आता दुसरा सीझन सुरू होत असल्यामुळे ती आणखीनच घाबरल्या आहेत. त्यामुळे आमिरने त्यांची भीती दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आमिरला अंडरवर्ल्डमधून किंवा इतर कोणाकडूनही धमकी मिळालेली नाही. असे असतानाही आमिरने नुकतीच एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. त्याचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही प्रत्येक क्षणी त्याच्या सोबतच असतात. जर फाइव्ह स्टार हॉटेलच्या वॉशरूममध्ये जायचे असले तरी तेथील माहिती सुरक्षा रक्षक आधीच घेऊन ठेवतात. यंदा आमिर वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्नदेखील करत आहे. तथापि, अद्याप कार्यक्रमातील सर्वच विषय गोपनीय ठेवण्यात आले आहेत. आमिर फक्त निवडणुकीबाबतच बोलत आहे.