आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Movie Heroin Proving To Be Hit Before It Is Released

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिनाचा ‘हीरोइन’ प्रदर्शनापूर्वीच हिट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या मधुर भांडारकरचा ‘हिरॉईन’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हिट झाला आहे. 25 जुलै रोजी या चित्रपटाचे फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर केवळ आठच दिवसांत हा प्रोमो 20 लाख जणांनी पाहिला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बंपर कमाई करील असा विश्वास मधुर भांडारकरला वाटत आहे. नुकतीच त्याने एक मुलाखत देऊन 'हिरॉईन'बाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
बॉलीवूडमध्ये मधुरच्या चित्रपटांची खास चर्चा होत असते. हिरॉईनबाबतही असेच झाले होते. करीनाच्या आधी या चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन मुख्य भूमिकेत होती. मात्र प्रेग्नन्सीमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला होता. त्यानंतर मोठे वादंग निर्माण झाले होते. मधुरने याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे आणि बच्चन परिवाराचे संबंध बिघडले होते. त्यानंतर या चित्रपटात करीना कपूरला साईन करण्यात आले. हिरॉईनमध्ये करिनाने खूप मेहनत घेतली आहे. तसेच तिने दमदार अभिनय केला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करील असे मधुरने सांगितले.
बॉलिवूड आणि ग्लॅमर जगतातील वास्तव या चित्रपटातून मांडण्यात येत आहे. मधुरचे चित्रपट वास्तवदर्शी असतात. याआधीदेखील ‘कॉर्पोरेट’ चित्रपटानंतर त्याच्यावर खूप टीका झाली होती. आता हिरॉईनमध्ये अनेक बोल्ड संवाद आणि दृश्ये असल्याने या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए दर्जाचे प्रमाणपत्र दिले आहे. यावर मधुरने सांगितले की, चित्रपटाला ए प्रमाणप्रत्र मिळणार हे मला माहीत होते. त्यामुळे याबाबत मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.
करिनाच्या वक्तव्यावर दुबईकर संतापले
चित्रपटातील एका सीनमध्ये करीना पत्रकारांना म्हणते, ‘खरंतर तुम्ही कथालेखकच व्हायला हवं. एखाद्या अभिनेत्रीने कार घेतली तर उद्योजकाने भेट दिली, असे चित्र रंगवले जाते. ती दुबईला गेली तर लगेच तिचा ‘रेट’ काढला जातो.’ करीनाच्या या संवादामुळे दुबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘जागतिक पातळीवर भरारी घेत असलेल्या शहरांविषयी करीनाचे हे उद्गार अवमानकारक आहे.’ अशी प्रतिक्रिया दुबईतील प्रसिद्ध रेडिओ जॉकी कृतिका रावतने व्यक्त केली आहे.
EXCLUSIVE LOOK: 'हिरॉईन' करीनाची दिलखेचक अदा
कान्समध्ये 'हिरॉईन' बनून ऐश्वर्याला मात देणार करीना
'हिरॉईन' मनीषा कोईरालाच्या जीवनावर आधारित नाही - मधुर भांडारकर
मधुर भांडारकरने केली हिरॉईन करीनाबरोबर धुळवड साजरी