आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहाणीत दम नाही, मात्र \'नौटंकी\' चांगली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावणलीला एक उत्कृष्ट सादरीकरण आहे. यामध्ये सिनेमातील हीरो दिग्दर्शक आणि रावण या दोन्ही भूमिका साकारतो. रंगमंच आणि वेशभूषा दोन्ही भव्य दिसतं. जर आमिर रजा हुसैन यांच्या 'द लीजेंड ऑफ राम' या कलाकृतीला वगळले भारतात ब्रॉडवे आणि वेस्ट अँड या प्रकारच्या मुख्यधारेच्या भव्य रंगमंचाची परंपरा नसल्याचे खेदाने म्हणावे लागेल. मात्र जेव्हा आपण सिनेमात नाटक बघतो, तेव्हा आपण मनातल्या मनात हा विचार करतो, की कदाचित अशी परंपरा पाहिजे होती. खरे तर मी गुडगांवमधील किंगडम ऑफ ड्रिम्समध्ये जाऊन त्यांचे सादरीकरण खरंच भव्यदिव्य असतं की नाही हे मी अद्याप बघितलेले नाही.

आत्तापर्यंत रावणलीलाचे 1500 प्रयोग हाऊसफूल झाले होते आणि असे वाटतं की प्रेक्षक वारंवार ते बघायला येत आहेत. (किंवा सगळ्या प्रेक्षकांमधील एक प्रेक्षक असा आहे, ज्याने शेवटच्याच आठवड्यात हा सिनेमा बघितला असावा.). मात्र ही गोष्ट लक्षात येत नाही, की नाटकाचे दिग्दर्शन आणि नाटकातील प्रमुख असलेली रामाची भूमिका त्याने आपल्या अशा मित्राला का दिली, ज्याला अभिनय तर सोडा पण साधे संवाददेखील आठवत नाहीत. हं पण ही रावणलीला 'जाने भी दो यारो' या सिनेमातील अविस्मरणीय अशा महाभारतातील दृश्याला टक्कर देऊ शकते. किंवा कदाचित नायकाने आपल्या मित्राला एक नोकरी मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. सिनेमातील एक व्यक्तिरेखा म्हणते की, तुम्ही आपल्या आयुष्यात काही केले नसले तरीदेखील तुम्ही एक अभिनेता बनू शकता, अभिनेता नाही तर एक दिग्दर्शक तरी नक्कीच बनू शकता.

यापूर्वी याच दिग्दर्शकाच्या 'ब्लफमास्टर' (2005) या सिनेमात मुंबई खूप शांत दिसली होती. कदाचित या सिनेमाचे शुटिंग ताज आणि हॉर्मिनल सर्कलच्या दरम्यान दक्षिण मुंबईत करण्यात आल्यामुळे असे झाले असावे. हा मुंबईतील असा परिसर आहे, जो आजही ग्लोबल मेट्रोपोलिससारखा आहे आणि काही काही न्यूयॉर्कच्या मॅनहचनची आठवण करुन देणारा आहे.

सिनेमातील हीरो राम परमार (आरपी) ची भूमिका आयुष्मान खुरानाने साकारली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'विकी डोनर' या सिनेमाच्या यशानंतर तो बॉलिवूडमधील प्रतिभावंत अभिनेता म्हणून उदयाला आला आहे. आरपीची भेट काही दिवसांपूर्वीच त्याचा मित्र मंदरबरोबर झाली होती. तो त्याला बीएफएफ (बेस्ट फ्रेंड फॉरेवर) म्हणून संबोधतो. ही भूमिका कुणाल रॉय कपूरने साकारली आहे. स्थूल बांधा असलेला हा अभिनेता यापूर्वी 'देल्ही बेली' (2011) या सिनेमामुळे लक्षात आहे. 'नौटंकी साला' हा सिनेमासुद्धा एक हलकी-फुलकी कॉमेडी आहे.

सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यात आरपी एका थेरेपिस्टबरोबर बसलेला दिसतो आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की सध्या त्याला झोप येत नाहीये. मात्र काही वेळातच आपल्या लक्षात येत की, वास्तविक पाहता मनोचिकित्सकाची गरज त्याला नसून त्याच्या मित्राला आहे. त्याचा मित्र समाजात मिसळत नाहीये. जास्त बोलत नाहीये. शून्य नजरेने टक लावून बघत असतो. अशा गोष्टींची कल्पना करतो, जणू ती वस्तू आकाशातून त्याच्या डोक्यावर पडणार आहे. दुःखद बाब म्हणजे, त्याच्यासोबत असे घडतेसुद्धा आणि तो निरर्थक प्रश्न विचारत असतो. आरपी आणि त्याच्या मित्राला बघून आपल्याला 1988 सालच्या रेन मॅन के रेमंड (डस्टिन हॉफमॅन) आणि चार्ली (टॉम क्रूज) यांची आठवण होते.

मला वाटतं की, जगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या वळणावर आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत असते. फरक एवढाच आहे की, कमी लोक ते प्रत्यक्षात उतरवतात. मंदर अशाच स्वभावाचा आहे आणि आरपी त्याचा जीव वाचवतो. प्रकरण मुलीचे आहे. मंदरचा प्रेमभंग झाला आहे. आरपी निश्चय करतो की, तो आपल्या मित्राला या परिस्थितीतून बाहेर काढेल आणि ब्रेकअप होऊनसुद्धा त्याला त्याची प्रेयसी परत मिळवून देईल. मात्र तो असे का करतो ? आपल्याला सांगितले जाते की, तो खूप चांगला माणूस आहे. नेहमी इतरांची मदत करण्यासाठी तत्पर असतो.


हा सिनेमा 'एप्रे वू' या फ्रेंच सिनेमाचा रिमेक आहे. त्यामुळे जी अडचण ओरिजनलमध्ये होती, तिच या रिमेकमध्ये सुद्धा दिसून येते. अडचण ही आहे, की सिनेमाच्या कथेत दम नाहीये. मात्र तरीदेखील थिएटरमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक पोटधरुन हसतात. लोक कलाकारांच्या अभिनयाची मजा घेत आहेत आणि सिनेमाच्या साऊंडट्रॅकवर ताल धरत आहे. त्यामुळे हा सिनेमा त्याच्या कथेपेक्षा उजवा असल्याचे आपल्या लक्षात येतं. कदाचित असे कॉमेडी आणि म्युझिकल सिनेमांविषयीच शक्य होऊ शकतं. हा सिनेमा कॉमेडी आहे आणि म्युझिकलसुद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांची नक्कीच निराशा करत नाही.