आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शॉर्टकट रोमियो\'साठी वेळ फुकट घालवू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेमाचे शीर्षक 'शॉर्टकट रोमियो' नव्हे, 'शॉर्टकट टू सक्सेस' असे हवे होते. हे शीर्षक या सिनेमातील कलाकारांसाठी रिल आणि रिअल लाईफमध्ये योग्य आहे. सिनेमाची कथा सुरु व्हायला काही मिनिटेच झाली असतानाच मोनिका (अमिषा पटेल) आणि आशिष (जतिन ग्रेवाल) यांचा झाडांच्या मागे लव्ह मेकिंग सीन सुरु होता. हा सीन जवळजवळ 40 सेकंदांचा आहे. या दृश्यानंतर प्रेक्षकांची नजर नील नितिन मुकेशवरुन वळून अमिषा पटेलवर खिळून राहते.

नीलची व्यक्तिरेखा एकदम ग्रिप सोडून देते आणि प्रेक्षक अमिषा पटेलच्या विवाहबाह्य संबंधांविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक होतात. काही वेळाने असं वाटतं की, प्रेक्षक टीव्हीवर एखाद्या क्राईम शोचा एपिसोड बघत आहेत. ज्यामध्ये पत्नीचे आपल्या पतीच्या मित्राबरोबरच विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. या सिनेमातील अमिषा पटेलच्या पतीची भूमिका साकारणा-या अभिनेता राजेश श्रृंगारपुरेचा अभिनय नील नितिन मुकेशपेक्षा निश्चितच चांगला झाला आहे.

खरं तर राहुल (राजेश श्रृंगारपुरे) या व्यक्तिरेखेने सिनेमाच्या क्लायमॅक्समध्येच आपला जलवा दाखवला आहे. मात्र नीलची संपूर्ण सिनेमातील डायलॉग डिलिव्हरी उत्कृष्ट झालेली नाही. जेव्हा जेव्हा सिनेमाची कथा बोअर होऊ लागते, तेव्हा तेव्हा एखादा सेक्स सीन किंवा हिरोईनचे बिकिनीत दर्शन घडतं. अर्थात सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये हा सिनेमा चालू शकतो.

तसे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, या सिनेमात अमिषाशिवाय पूजा गुप्ता ही दुसरी हीरोईनसुद्धा आहे. कथेत पूजा नीलच्या अपोझिट आहे. मात्र तिने अभिनयाचे धडे गिरवण्याची नितांत गरज आहे. कारण प्रत्येक वेळी बिकिनी बॉडी दाखवून चालत नाही.

सिनेमाचे शूटिंग मुंबई आणि केन्यामध्ये झाले आहे. सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे, असे म्हणजे चुक होईल. कारण सिनेमातील दृश्य कलरफूल दिसू शकली असती. मात्र शेवटपर्यंत सिनेमाला डल लूक आला आहे. केन्यामध्ये दाखवण्यात आलेल्या सफारी सीन आणि शूटिंगला सिनेमॅटोग्राफर योग्य न्याय देऊ शकला नाही. स्क्रिनप्लेचीही तिच स्थिती आहे.
सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये नील नितिन मुकेशच्या वागण्यामागचे कारण सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये कळतं. मात्र भूमिकेत शिरण्यासाठी नील नितिन मुकेशने केलेला आटापिटा त्याच्या चेह-यावर स्पष्ट दिसून येतो. डायलॉग डिलिव्हरी करताना प्रेक्षकांना आपली भूमिका पसंत पडावी, अशी प्रार्थना कदाचित नील नितिन मुकेश करत असावा.

कथेत सूरज (नील नितिन मुकेश)ला नेहमी श्रीमंती थाटात जगायचं असतं. त्यासाठी तो आशिष (जतिन ग्रेवाल) आणि मोनिका (अमिषा पटेल)चा सेक्स व्हिडिओ बनवतो आणि संपूर्ण सिनेमात सूरज मोनिकाला ब्लॅकमेल करत राहतो. सिनेमात नील आणि अमिषा पटेल यांच्यात सेक्स व्हिडिओ लीक होण्याचा खेळ सुरु राहतो. बुद्धिबळाच्या या खेळात अचानक पूजा गुप्ताची एन्ट्री होते. पूजावर नीलचं प्रेम जडतं आणि कथेत एक नवा ट्विस्ट येतो.

मोनिकाचा (अमिषा पटेल) नवरा राहुल (राजेश श्रृंगारपुरे)ला जेव्हा सेक्स व्हिडिओबद्दल कळतं तेव्हा त्याची व्यक्तिरेखा सरप्राईज घेऊन येते. अर्थात सिनेमात अमिषा पटेल, राजेश श्रृंगारपुरे आणि जतिन ग्रेवालचा अभिनय चांगला झाला आहे. सिनेमात नीलचे काही अ‍ॅक्शन सीन्ससुद्धा आहेत. मात्र त्याने काही वेगळे केलेले नाही. खरं तर अमिषा पटेलने कथेत अंगप्रदर्शन करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. असो, श्रीमंत नव-याच्या पत्नीची भूमिका साकारताना तिला असे करणे गरजेचे होते.

सिनेमातील मोहित चौहानने गायलेले 'खाली सलाम दुआ...' हे गाणे चांगले झालेले आहे. मीका आणि हिमेशनेसुद्धा सिनेमातील पार्टी आणि डिस्कोची गाणी गायली आहेत. मात्र ही गाणी ऐकून खूप मजा येत नाही. सिनेमात कॉमेडीच्या तडक्यासाठी चिकनी चमेली, जलेबी बाई आणि मुन्नीचा डान्सही आहे.

सिनेमा बघून असं वाटतं की, दिग्दर्शकाने 'हमराज' हा सिनेमा दहा वेळा बघितला आणि त्यानंतर तो सिनेमा नव्या ढंगात सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र असे शक्य झाले नाही. या सिनेमाचे दिग्दर्शक सुसी गणेशन यांना तीन तामिळ सिनेमांसाठी तामिळनाडू स्टेट फिल्म अवॉर्ड मिळाले आहेत, मात्र या सिनेमावर त्यांनी आणखी काम करायची गरज होती.