मुंबई - बी टाऊनचा नवोदित अभिनेता वरुण धवनने 'स्टुडंट ऑफ द इयर' या त्याच्या पहिल्याच सिनेमात आपला दम दाखवला होता. आता त्याचा 'मैं तेरा हीरो' हा दुसरा सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या सिनेमावर लागल्या आहेत.
वरुण रोमँटिक कॉमेडी असलेल्या या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन करतोय. मुंबईत बुधवारी (4 मार्च) या सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी वरुणसह त्याची को-स्टार नर्गिस फाखरीसुद्धा हजर होती. दोघेही खूप आनंदी दिसत होते.
ज्युनिअर धवनने यावेळी स्टेजवर परफॉर्मही केले. शिवाय त्याने त्याचे वडील डेविड धवन यांनाही स्टेजवर ठुमके लावण्यास सांगितले.
डेविड धवन म्हणाले, ''माझ्या मुलाला दिग्दर्शित केल्याचा मला आनंद आहे. या सिनेमाच्या शुटिंगचा प्रवास माझ्यासाठी खूप रंजक ठरला.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा वरुण-नर्गिसने कसे मजा-मस्तीत केले सिनेमाचे म्युझिक लाँच...