आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • My Children Does't Know My Propoganda, Madhuri Dixit Say

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी प्रसिद्धी मुलांच्या गावीही नाही, धकधक गर्ल माधुरी दीक्षितची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या आरसपानी सौंदर्यांने बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणा-या माधुरी दीक्षितचे असंख्य चाहते आहेत. मात्र ‘आपली ही प्रसिद्धी मुलांच्या गावीही नाही. माझी मुले अजूनही मला टीव्हीवर पाहण्यासाठी उत्साही असतात’, अशी माहिती ‘धकधक गर्ल’ने एका कार्यक्रमात बोलताना दिली.


माधुरी आणि श्रीराम नेने दांपत्याला आरीन आणि रायान अशी दोन मुले आहेत. त्यांना माझी प्रसिद्धी, स्टारडम याबद्दल काही समजते की नाही हे मला माहीत नाही. पण आजही माझी मुले माझ्याकडे धावत येतात आणि मला विचारतात, ‘खरंच तू इतकी फेमस आहेस?’ त्यांचे असे विचारणे मला आवडते. त्यांनी असेच साधे राहिलेले आपल्याला आवडेल, असेही माधुरी या वेळी बोलताना म्हणाली.


लवकरच पुनरागमन
लग्नानंतर पतीसोबत माधुरी जवळपास दशकभरासाठी अमेरिकेत स्थायिक झाली होती. नंतर ती पुन्हा मुंबईत आली. लवकरच रुपेरी पडद्यावर माधुरीचे पुनरागमन होणार आहे. ‘गुलाब गँग’ व ‘डेढ इश्किया’ या चत्रपटांत सध्या ती काम करत आहे.


शास्त्रीय नृत्य हाच पाया
माधुरी सध्या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज आहे. ‘तरुणांना फास्ट आणि सोप्या मार्गाने यश मिळावे असे वाटते. त्यामुळे पाश्चिमात्य शैलीच्या नृत्यांना ते अधिक प्राधान्य देताना दिसतात. पण त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याला प्राधान्य द्यावे, कारण हाच पाया आहे,’ असे माधुरीचे मत आहे.