आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • My Mother Would Have Married Me Off At 16: Kangana Ranaut

REVEAL: 'आईचे म्हणणे ऐकले असते तर माझे 16 व्या वर्षीच लग्न झाले असते'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना राणावतने नुकताच खुलासा केला की, ''मी माझ्या आईचे म्हणणे ऐकले असते तर वयाच्या 16 व्या वर्षीच माझे लग्न झाले असते.''

'थँक यू मॉम' या खास कार्यक्रमात कंगनाने हा खुलासा केला. कंगनाने सांगितले की, ''माझे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न व्हावे, अशी आईची इच्छा होती. तिच्या मते लग्नसाठी हेच योग्य वय आहे. घरात लग्नाच्या विषयावर बरीच चर्चा रंगत होती. इतकेच नाही तर माझ्या भावाचे वय 22 वर्षे आहे आणि माझी आई विचार करतेय की त्याचे लग्नाचे वय निघत चालले आहे.''
या कार्यक्रमात कंगनाला प्रश्न विचारला गेला की, ती लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज, कंगनाने याचे उत्तर देणे टाळले.
या कार्यक्रमात कंगनाची आई आशा राणावतही यांनीही हजेरी लावली होती. शिवाय शक्ति कपूरची पत्नी, मुलगी श्रद्धा कपूर , दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्यांच्या आईनेही हजेरी लावली होती.
एक नजर टाकुया या कार्यक्रमात क्लिक झालेल्या छायाचित्रांवर...