आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOLLYWOOD MYSTERY: या कारणांमुळे निर्माण झाली सलीम-जावेदमध्ये \'दीवार\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलीम-जावेद ही बॉलिवूडची सुपस्टार जोडी अखेर कोणत्या कारणामुळे तुटली, हे आजही सिनेरसिकांना जाणून घ्यायचे आहे. नात्यात वितुष्ठ निर्माण झाल्यानंतर देखील या जोडीने कधीही एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप केले नाहीत, शिवाय त्यांची जोडी नेमकी कोणत्या कारणामुळे तुटली हे देखील कधी जगासमोर येऊ दिले नाही. म्हणूनच तर यांचे विभक्त होणे हे बॉलिवूडमधील मोठे रहस्य बनले आहे. आम्ही देखील ही जोडी नेमकी कोणत्या कारणामुळे तुटली, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आगे.

दीवार (1975), जंजीर (1973), डॉन (1897) समवेत अनेक सुपरहिट सिनेमांची स्क्रिप्ट लिहिणारे सलीम-जावेद यांचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखकांमध्ये सामील आहे. एकत्र काम करत असताना सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने सहा फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावी केले.

दोघांनी मिळून अनेक सुपरहिट सिनेमांसाठी स्क्रिप्ट लिहिली. सलीम-जावेद यांनी एस.एम. सागर यांच्या 'सरहदी लुटेरा' या सिनेमापासून एकत्र काम करायला सुरुवात केली. यापूर्वी सलीम सिनेमांमध्ये अभिनयदेखील करत होते, मात्र यश मिळू न शकल्यामुळे ते लेखनाकडे वळले.

15 वर्षे या दोघांनी एकत्र मिळून अनेक सिनेमांसाठी लेखन केले, ते सर्वच सिनेमे सिल्व्हर स्क्रिनवर सुपरहिट सिद्ध झाले. 1987 साली रिलीज झालेला 'मिस्टर इंडिया' हा सलीम-जावेद यांचा शेवटचा सिनेमा होता.
असे सांगण्यात येते की, जावेद अख्तर स्क्रिप्ट सोडून सिनेमांसाठी गीत लेखन करु इच्छित होते. त्यामुळे त्यांनी वेगळे होणे पसंत केले आणि 15 वर्षे यशस्वी ठरलेली ही जोडी अखेर विभक्त झाली.

एवढा दीर्घ काळ एकत्र राहिलेली ही जोडी तुटल्यानंतर त्यामागे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. सलीम-जावेद यांचे विभक्त होणे, ही बॉलिवूडमधील मोठी कॉन्ट्रोव्हर्सी ठरली.

या जोडीच्या विभक्त होण्यामागची नेमकी कारणे कोणती ते पाहुया..