आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नायक- 2’ ची कथा वेगळी- अनिल कपूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एका दिवसाचा मुख्यमंत्री होऊन जनहिताची कामे फटाफट करणारा अभिनेता अनिल कपूर याच्या 2001 मधील ‘नायक’ या चित्रपटाचा दुसरा भाग ‘नायक रिटर्न्‍स’ लवकरच येणार आहे. हा पहिल्या चित्रपटापेक्षा एकदम वेगळा असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सिक्वेल नाही. नुकताच हा चित्रपट मी स्वीकारला असल्याचे अनिलने सांगितले. नायकमध्ये त्याने अमरीश पुरी यांना आव्हान देत एक दिवसाचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते, अशी या चित्रपटाची थीम होती. अनिलसोबत राणी मुखर्जी आणि शिवाजी साटम यांच्याही भूमिका होत्या. दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर यांच्या ‘मुधालवन’ या तामिळ चित्रपटाचा नायक हा रिमेक होता. ‘रिटर्न्‍स’मध्ये अभिनेत्री म्हणून तब्बू बर्‍याच दिवसांनंतर प्रेक्षकांना दिसणार आहे. अनिल सध्या ‘शर्माजी का आयटम बॉम्ब’ या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट ‘तेरे बिन लादेन’चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांचा आहे.