आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड चित्रपटात काम करणार नर्गिस फाखरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’मुळे नर्गिस फाखरीची लोकप्रियता टिकून आहे. याशिवाय ‘मद्रास कॅफे’मध्ये तिने ज्या पद्धतीने भूमिकेला न्याय दिला त्यावरून तिची प्रशंसादेखील झाली. मात्र, ही प्रसिद्धी तिला करिअरच्या भरभराटीसाठी उपयोगी पडू शकली नाही, परंतु सध्या तिला बॉलिवूडमधून नव्हे तर हॉलिवूडच्या एका चित्रपटाची ऑफर मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटात नर्गिस फाखरीचा नंबर लागण्यामागे तिने बॉलिवूडमध्ये केलेल्या कामाचा काहीएक संबंध नाही. नर्गिसला ही संधी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला तो तिचा प्रियकर उदय चोप्राने. उदय यशराज बॅनरच्या आदित्य चोप्राचा छोटा भाऊ असून तो ‘धूम’ चित्रपटात दिसला होता.
यशराजच्या लॉस एंजलिसस्थित कंपनीच्या वायआरएफ एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तिला हे काम मिळाले आहे. ही कंपनी हॉलिवूडच्या चित्रपटांची निर्मिती करते. उदय या कंपनीचा संचालक असून चित्रपटात नर्गिस महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या ती ‘मैं तेरा हीरो’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.