आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naseeruddin Shah Criticises Farhan Akhtar's Act In 'Bhaag Milkha Bhaag

पिळदार शरीरयष्टीने अभिनय येत नाही, नसरुद्दीन शाह यांची फरहान अख्तरवर झोंबरी टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धावपटू मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले असले, तरी प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शाह यांना हा चित्रपट आवडला नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगून केवळ पिळदार शरीरयष्टी केल्याने अभिनय झाला, असे होत नसल्याचे सांगितले. त्यांच्या वक्तव्यानंतर बॉलीवूडमध्ये या विषयावर चवीने चर्चा रंगत आहेत.
ते म्हणाले, ‘भाग मिल्खा भाग’साठी फरहानने बरेच कष्ट घेतले, यात काहीच वाद नाही. मात्र, केवळ पिळदार शरीरयष्टी आणि केस वाढवले म्हणजे अभिनय झाला, असे होत नाही. अभिनयासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, असे सांगत त्यांनी फरहानवर चांगलेच तोंडसुख घेतले. तसेच चित्रपटात फरहान खरोखरच मिल्खासिंग यांच्यासारखा दिसत होता का, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मिल्खा यांचा 1९६0 मधील फोटो निरखून पाहिल्यास फरहान अख्तरला अजिबात त्यांच्यासारखे दिसता आलेले नाही. एकूणच या चित्रपटात त्याला थोडाही अभिनय करता आला नाही, असेही ते म्हणाले.