आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमेपलीकडेही आहेत नसीरुद्दीनचे चाहते, पोस्टाने पाठवली सिनेमाची ऑफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

80 च्या दशकात अभिनयाची सुरुवात करणारे नसीरुद्दीन शाह एक अष्टपैलू कलावंत आहेत. 62 व्या वयात ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात बोल्ड अभिनय करून त्यांनी बड्या कलावंतांना मागे टाकले. आपल्या अभिनय कौशल्यामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. म्हणून एक पाकिस्तानी दिग्दर्शकांची जोडी त्यांचे गोडवे गात आहे.

‘जिंदा भाग’ या पाकिस्तानी चित्रपटाची दिग्दर्शक मीनू गौड आणि फरजाद नबी नसीरुद्दीन शाहचे खूप मोठे चाहते आहेत. सध्या ही जोडी शाह साहेबांचे सर्वत्र कौतुक करत आहेत. आपण पोस्टाने पाठवलेल्या एका कथानकाला त्यांनी होकार देऊन आमची निराशा केली नाही, असे ते सर्वत्र सांगत फिरत आहेत. मूळची भारतीय दिग्दर्शक असलेली पाकिस्तानी दिग्दर्शक मीनू गौड यांनी सांगितले की, चित्रपटात एक पहिलवानाचे पात्र आहे. त्या पात्रासाठी आमच्या डोळ्यासमोर फक्त नसीरुद्दीन शाहच होते. त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही ते पात्र तयार केले. मात्र आमच्या छोट्या चित्रपटात ते काम करतील की नाही याची धास्ती होती. तेव्हा निर्माता मजहर जैदीने नसीरसाहेबांचा पत्ता काढला आणि त्यांना पोस्टाने कथानक पाठवले. नसीर साहेबाने कथानक वाचून आमच्या चित्रपटाचे कौतुक केले आणि भूमिका नक्कीच करेन, असे कळवल्यावर विश्वास बसला नव्हता.