आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NATALIYA KOZHENOVA HAS A HUGE CRUSH ON ARJUN RAMPAL

REVEAL: युक्रेनची ही मॉडेल पडली अर्जुन रामपालच्या प्रेमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटींबद्दल क्रश असणं हे सामान्य प्रेक्षकांसाठी स्वप्नवतच असतं. फार कमी लोकांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना भेटणं शक्य होतं. युक्रेनची मॉडेल नतालिया कोजेनोवा भाग्यशाली लोकांपैकी एक आहे. नतालियाला तिचा क्रश असलेल्या अर्जुन रामपालची भेट घेण्याची संधी मिळाली. नतालिया अभिनेता अर्जुन रामपालची मोठी चाहती आहे आणि त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळवण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे.

'अन्जुना बीच' या सिनेमाद्वारे नतालिया बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. शिवाय लवकरच रिलीज होणा-या 'द सिटी दॅट नेवर स्लिप्स' या सिनेमातही ती झळकणार आहे.

अर्जुनविषयी नतालिया म्हणाली की, ''अर्जुन रामपाल बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याची स्टाईल आणि लूक हटके आहेत. माझ्यासाठी अर्जुनच बेस्ट अ‍ॅक्शन हीरो आहे. मला तो खूप आव़डतो. त्याला भेटण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदात आहे.''