आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीत सुरू होणार मुंबईत देशातील पहिले चित्रपट संग्रहालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीने शताब्दी गाठली. मात्र, कोट्यवधींचे आकडे पार करणा-या या चित्रपटसृष्टीचा यशस्वी प्रवास दाखवणारे एकही संग्रहालय भारतात नव्हते; परंतु आता असे संग्रहालय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबईच्या पेडर रोडवर तयार होत असलेले हे संग्रहालय पुढील महिन्यात सुरू होणार असल्याचे समजते.
जर्मनीतील चित्रपट संग्रहालय जगात प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर भारतातही सुरू करावे, अशी योजना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चार वर्षांपूर्वी आखली होती. त्यासाठी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. कोलकात्याच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि मुंबईतील फिल्म डिव्हिजनच्या आवारातील गुलशन महाल इमारतीची यासाठी निवड करण्यात आली. 150 वर्षे जुन्या या इमारतीला नवे रूपडे देण्याचे काम सुरू झाले. केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी बुधवारी गुलशन महाल इमारतीचा आढावा घेतला. संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
असे आहे म्युझियम
50 हजार चौरस फूट जागेवरील संग्रहालयाचा पहिला टप्पा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गुलशन महालमध्ये तयार केला आहे. सहा हजार चौरस फुटांवर उभारलेल्या या संग्रहालयात चित्रपटांचा 100 वर्षांचा इतिहास जागवण्यात येईल. लुमियर ब्रदर्स, राजा हरिश्चंद्रापासून भारतीय चित्रपटसृष्टीने कसा आकार घेतला, ते येथे मांडण्यात आले आहे.