आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या नातीने दिली मित्रांना पार्टी परंतु दिसला नाही शाहरुखचा मुलगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा शहेंशाह अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली सध्या इंग्लंडमध्ये शिकत असून तिचा मित्र परिवार भरपूर मोठा आहे.

नव्या लंडन येथील सेवेनॉक्स स्कूलमध्ये शिक्षण घेत असून शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा तिच्यासोबत एकाच वर्गात शिकत आहे. स्कूलमध्ये आणि भारतातही या दोघांची मैत्री पाहण्यास मिळते.

नुकतीच शाहरुखने आपल्या घरी ईदची पार्टी दिली होती, ज्यामध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते. नव्या सुद्धा या पार्टीमध्ये सहभागी झाली होती.

नुकतेच नव्याने सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या शाळेतील मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. परंतु चकित करणारी गोष्ट म्हणजे या फोटोंमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन कुठेही दिसत नाही.