आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या 'किक'मध्ये काम करणार नवाजुद्दीन, अनेक गोष्टींचा केला खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला आतापर्यंत सर्वांनी खूप गंभीर भूमिकेत आणि काही निवडक सिनेमांमध्येच अभिनय करताना बघितले आहे. त्याचा आता पुढचा प्रोजेक्ट आहे सलमानचा सिनेमा 'किक'. सलमान खानचा सिनेमा असल्याने अंदाज बांधला जात आहे, की 'किक' हा एक व्यवसायिक सिनेमा असू शकतो. यापूर्वीसुध्दा नवाजुद्दीन 'सरफरोश' आणि 'तलाश'सारख्या व्यवसायिक सिनेमात दिसला होता.
याविषयी जेव्हा नवाजसोबत बातचीत केली तेव्हा त्याने सांगितले, की 'असे नाहीये की मला मोठ्या आणि दिग्गज स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळेल म्हणजे मी काहीही करायला लागेल.' नवाजने सांगितले, की 'मी व्यवसायिक सिनेमांच्या विरोधात नाहीये, परंतु मी तर्कहीन सिनेमांच्या विरोधात आहे. असे नाही की प्रत्येक व्यवसायिक सिनेमाला काही अर्थ नसतो. '3 इडियट्स' हे व्यवसायिक सिनेमाचे एक मोठे उदाहरण आहे. हा एक व्यवसायिक सिनेमा होता परंतु त्याची पटकथा उत्कृष्ट होती.'
'किक' सिनेमाचा मुख्य अभिनेता सलमान खान आहे. अशावेळी सर्व लक्ष सल्लूवर असणार आहे आणि दुस-या कलाकारांना विशेष काही करण्यासारखे नसेल. परंतु नवाज या गोष्टी नाकारून सांगतो, जी भूमिका तो करत आहे, ती खूप चांगली आहे. नवाज त्याच्या भूमिकेला अर्थपूर्ण असल्याचेही मानतो आणि प्रत्येक धारणेची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो.
असेही सांगितले जाते, की नवाज या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहे. याविषयी नवाजने सांगितले, की सिनेमाची शुटिंग अजून सुरू झालेली नाहीये. त्यामुळे तो कोणताही खुलासा करू शकत नाही. नवाजने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, की सिनेमात तो एक सहकलाकाराच्या भूमिकेत असणार आहे. जर पटकथेच्या आधारावर त्याला मुख्य भूमिका मिळाली तर तो या सिनेमात काम करणार आहे. जर सहकलाकाराची भूमिकासुध्दा प्रभावी असेल तर त्याला सिनेमात काम करण्यासाठी काही अडचण नाहीये.
पुढील स्लाइड्सवर वाचा 'पीके' सिनेमाच्या रिलीज डेटसाठी आमिर पडला गोंधळात