आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawazuddin Siddiqui Skips Irrfan Khan's Name In Fimfare

नवाजुद्दीन आणि इरफान यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘द लंचबॉक्स’साठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना नवाजुद्दीन सिद्दिकीने इरफान खानसोबत शीतयुद्द जाहीर केले. या कार्यक्रमात नवाजने इरफानला सोडून चित्रपटाशी संबंधित सर्वांचे आभार मानले होते. त्यामुळे ‘द लंचबॉक्स’पासून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. दोघेही स्वतंत्र अस्तित्व असलेल्या चित्रपटातील कलावंत असल्याने त्यांना चांगली भूमिका मिळण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये चित्रपट निर्मात्याने इरफानला आपला आंतरराष्ट्रीय चेहरा असल्याचे म्हटले होते. याचे नवाजला वाईट वाटले. जगातील सर्व मीडिया हाऊसना इरफानने मुलाखती दिल्या आणि नवाजला बाजूला केले. कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान जेव्हा दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केले तेव्हा त्यांच्यातील कटुता पाहायला मिळाली. माध्यमांनी सांगितले की, हे शीतयुद्ध आहे; परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मात्र, शुक्रवारी रात्री 59 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात नवाजने ‘द लंचबॉक्स’चा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार स्वीकारला तेव्हा त्याने सर्व टीमचे आभार मानले, पण इरफानचे नावदेखील त्याने घेतले नाही. यशाच्या आनंदाने भावूक झालेला नवाज स्टेजवर येताच घाबरायला लागला. तो बोलला, ‘माझी जीभ अडखळू लागली..’ यावर तिथे उपस्थित असलेल्या रणबीर कपूरने त्याला प्रोत्साहन देत त्याचा उत्साह वाढवला व म्हणाला, ‘तुझी हुशारी तुला प्रगतिपथावर नेईल.