आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनीला अश्लिल म्हणणारे आता तिला वेलकम करण्यासाठी आतुर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने ठाण्यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. ही दहीहंडी ठाण्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी असते. जवळजवळ १५००० लोक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. या कार्यक्रमाला सनी लियोनला आमंत्रित करण्यात आले आहे. सनीला अश्लिल म्हणणा-या राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांनीच सनीला हे निमंत्रण दिले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी सनीचा गर्दीपासून बचाव करण्यासाठी स्थानिक पोलिस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कामाला लावण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वी सनीच्या 'जिस्म २'चे पोस्टर अश्लिल असल्याचे कारण पुढे करुन मुंबईतील बेस्ट बसेसवरुन सगळे पोस्टर काढून टाकण्याची विनंती राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मुंबईच्या महापौरांकडे केली होती. विशेष म्हणजे विद्या चव्हाण यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या महापौरांनी बेस्ट बसेस आणि होर्डिंग्सवरुन 'जिस्म २' चे पोस्टर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. आता त्याच विद्या चव्हाण यांनी सनीला दहीहंडीच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे.

महापौरांचे बेस्ट बसेसवरुन 'जिस्म २'चे उत्तेजक पोस्टर काढण्याचे ऑर्डर
भोपाळमध्ये 'जिस्म-२' चित्रपटाला तीव्र विरोध
PICS : 'जिस्म 2'साठी सनीने केले हॉट बेडरुम फोटोशूट