आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शॉटकर्ट रोमियो’ नीलचा कमर्शियल डेब्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर नील नितीन मुकेशने आतापर्यंत 10 सिनेमांत काम केले आहे. बाल कलाकार म्हणून त्याने 1988 मध्ये ‘विजय’ सिनेमातून डेब्यू केले होते. मात्र, त्याच्या इतक्या दिवसाच्या कारकीर्दीत फ्लॉप सिनेमांची संख्या जास्त आहे. समीक्षकांची प्रशंसा मिळूनही तो फ्लॉप हीरोच्या श्रेणीत आहे. आता ही इमेज पुसण्यासाठी नील मसाला कमर्शियल सिनेमांकडे वळला आहे. आतापर्यंतच्या केलेल्या सिनेमात व्हेरिएशन होते, मात्र बॉक्स ऑफिसवर यश न मिळाल्याने निवडक सिनेमे करण्याचे त्याने ठरवले आहे.

जूनमध्ये प्रदर्शित होणार्‍या ‘शॉटकर्ट रोमियो’ मध्ये नील एका चपळ फायटर आणि प्लेबॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. सुसी गणेशनचा हा सिनेमा आहे. सिनेमाची कथा ऐकताच त्याने होकार दिला होता. म्हणून तो या सिनेमाला आपला कमर्शियल डेब्यू म्हणत आहे.