आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय-नीरजच्या सिनेमाचे शुटिंग मार्चमध्ये होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 च्या सरुवातीला अक्षय कुमारचा 'स्पेशल 26' सिनेमा साधारण हिट मानला जात होता. मात्र, वर्षअखेरपर्यंत तो सुपरहिट ठरला. या सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडेने केले होते. नीरजने 2008 मध्ये 'अ वेनसडे' या हिट सिनेमाची निर्मिती करून भारतीय सिनेमासृष्टीत दमदार प्रवेश केला होता. या सिनेमासाठी अक्षयच्या तारखा मिळवण्यासाठी नीरजला तब्बल 3 वर्षांची वाट पाहावी लागली होती. मात्र, सिनेमाच्या यशानंतर अक्षय आपल्या या अस्थिर करिअरमध्ये स्थिर क्रिएटिव्ह भागीदार म्हणून नीरजकडे पाहू लागला. याच कारणामुळे नीरजच्या आगामी सिनेमांचे शुटिंग अत्यंत कमी कालावधीत सुरू होत आहे. ही जोडी आपल्या आगामी सिनेमाच्या शुटिंगचा श्रीगणेशा पुढील महिन्यात करत आहे. मात्र सिनेमाचा विषय अद्यापतरी सार्वजनिक करण्यात आला नाही. शिवाय नीरजने 'स्पेशल 26' सिनेमाचा सिक्वेल बनवणार असल्याचेही नाकारले नाही.