आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL: लता दीदींनी ठेवले होते नीलचे नाव, सिनेमांच्या आवडीपोटी केली गायनाकडे पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता नील नितिन मुकेश आज 32 वर्षाचा झाला आहे. या अभिनेत्याचे नाव थोडे मोठे आहे. कारण त्याच्या नावासोबत वडीलांचे आणि आजोबांचे नाव जोडलेले आहे. नील प्रसिध्द पाश्वगायक मुकेश यांचा नातु आणि नितिन मुकेश यांचा मुलगा आहे. खास गोष्ट आहे, की या अभिनेत्याचे नील नाव लता दीदींनी ठेवले आहे. हे नाव अंतराळवीर नील आर्मस्ट्रांगच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
एका प्रसिध्द गायकाच्या कुटुंबातील असून नीलने अभिनयात त्याचे करिअर केले. त्याला अभिनय करणे बालपणापासून आवड होते. तो अनेक सिनेमात बालकलाकारच्या रुपातही दिसला होता.
फिल्मी जगात पदार्पण केल्यानंतर नीलला मुख्य भूमिकेसाठी अनेक ऑफर मिळाल्या होत्या. परंतु त्याला त्याच्या फिल्मी करिअरची सुरूवात लव्हस्टोरीच्या कथा असणा-या सिनेमांनी करायची नव्हती. त्याने एक चांगली भूमिका मिळण्याची प्रतिक्षा केली. त्या दरम्यान त्याने दिग्दर्शक आदित्य चोप्राच्या 'मुझसे दोस्ती करोगे' सिनेमासाठी त्यांना सहकार्य केले.
त्यानंतर त्याला थ्रिलर सिनेमा 'जॉनी गद्दार'ची ऑफर मिळाली आणि त्याची प्रतिक्षा संपली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नीलच्या जीवनाविषयी काही खास गोष्टी...