आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE: मोठया बजेटचे सिनेमे आपटले, तर छोट्यांची कमाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सोमवारपर्यंत संमिर्श व्यवसाय केला आहे. यात मोठ्या बजेटच्या सिनेमांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, छोट्या बजेटच्या सिनेमांनी चांगली कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बहुचर्चित 'जॉली एलएलबी' सिनेमाने तिकीट खिडकीवर सोमवारपर्यंत 14.41 कोटी रुपये व्यवसाय केला. सिनेमा निर्माती कंपनी फॉक्स स्टार इंडिया नफ्यात राहील, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या सिनेमाचे सॅटेलाइट हक्कही चांगल्या किमतीत विकले. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मुंबईत 'जॉली एलएलबी'ने चांगला व्यवसाय केला.

यशराज फिल्मचा 'मेरे डॅड की मारुती' प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला नाही. पहिल्या आठवडा व त्यानंतरच्या दोन दिवसांत त्याने केवळ 5.40 कोटी रुपये गल्ला केला. नील नितीन मुकेशचा 'थ्री जी' प्रेक्षकांना भावला नाही. सिनेमाने छोट्या थिएटरमध्ये पहिल्या आठवड्यात 5 कोटी रुपये व्यवसाय केला.

नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये तिग्मांशू धुलियाच्या 'साहिब बीबी और गॅँगस्टर रिटर्न्‍स'ने 18.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. संजय मिश्रासारखा अभिनेता असूनही सुमार पटकथेमुळे 'सारे जहां से महंगा' हा विनोदी सिनेमा चालला नाही. जॉन अब्राहमच्या 'आई मी और मैं' 9 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित राहिला. सिनेमात गुंतवलेले पैसेही यातून निघू शकले नाहीत.

'काई पो छे'चा चांगला व्यवसाय- रामगोपाल वर्मा यांचा 'द अटॅक ऑफ 26/11' सिनेमा आपटला आहे. '26/11' केवळ 11.50 कोटी रुपये कमाई करू शकला. संजय दत्तच्या 'जिला गाझियाबाद'ने 16 कोटीची कमाई केली. नवोदित कलाकारांना घेऊन तयार करण्यात आलेल्या 'काई पो छे' सिनेमाने भारतात 49.75 कोटी रुपये वसूल केले. 'एनीबडी कॅन डान्सने (एबीसीडी)' 45.5 कोटी व्यवसाय करून हिट सिनेमाच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'स्पेशल छब्बीस' सिनेमाने 66 कोटींचा व्यवसाय केला.