आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोल्डनेसच्या अभावामुळे यामीची ‘शौकीन’मधून माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शौकीन’ चित्रपटातून नर्गिस फाखरीचा पत्ता कट झाल्यानंतर यामी गौतमला या चित्रपटात संधी मिळणार होती. मात्र, सूत्रांच्या मते आता यामीलादेखील हा चित्रपट सोडावा लागणार आहे. या चित्रपटासाठी तिच्या लूकची चाचणीदेखील झाली होती. खरे तर, दिग्दर्शक अभिषेक शर्मा अभिनेत्रीची भूमिका थोड्याशा हॉट पद्धतीने सादर करू इच्छितात. तसेच चित्रपटाची कथादेखील याच अनुषंगाने आहे. यामीची चाचणी झाल्यानंतर तिच्यामध्ये बोल्ड एलिमेंटचा अभाव दिसून आला. यामुळे यामीला चित्रपट सोडावा लागला. आता चित्रपटातील या बोल्ड भूमिकेसाठी श्रद्धा कपूरचे नाव पुढे आल्याचे वृत्त आहे.
‘आशिकी 2’मध्ये साध्या-भोळ्या मुलीची भूमिका साकारलेल्या आरोहीकडून हॉट भूमिका साकारण्याबाबत कल्पनादेखील केली जाऊ शकत नाही. मात्र, ‘द विलेन’ चित्रपटात श्रद्धाच्या लूकबाबत अनेक प्रयोग करण्यात आले असून तिला एका नव्या रूपात सादर केले जाणार आहे. या कारणामुळेच ‘शौकीन’ चित्रपटाच्या निर्मात्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले आहे. लवकरच तिच्या लूकची चाचणी घेऊन तिच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.