आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षांचा झाला बॉलिवूडचा 'आर...राजकुमार', बघा त्याचे काही UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा 'आर...राजकुमार' शाहिद कपूर आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिदचा जन्म 25 फेब्रुवारी 1981ला दिल्लीमध्ये झाला होता. शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. शाहिदने त्याच्या करिअरची सुरूवात जाहिरातीमधून केली होती.
एक अभिनेता म्हणून त्याने 2003मध्ये प्रदर्शित झालेला 'इश्क विश्क'मध्ये उत्कृष्ट अभिनेय केला होता. या सिनेमासाठी शाहिदला 'फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार मिळाला होता. 'इश्क विश्क'नंतर 'फिदा', 'दिल मांगे', 'दीवाने हुए पागल' ,'वाह लाइफ हो तो ऐसी', 'शिखर', '36 चायना टाउन', 'चुप चुप के'सारख्या सिनेमांत त्याने चांगला अभिनय केला.
विशेष म्हणजे, शाहिदच्या फिट बॉडीमुळे त्याला बॉलिवूडमधील सर्वात फिट बॉडीच्या अभिनेत्यांमध्ये मोजले जाते. 'विवाह' आणि 'जब वी मेट'पासून त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदचे बॉलिवूडची बेबो करीना कपूरसोबत दिर्घकाळ अफेअर होते. परंतु काही कारणास्तव दोघेही एकमेकांपासून वेगळे.
शाहिदच्या बर्थडेनिमित्त बघूया त्याची काही खास छायाचित्रे ज्यामध्ये तुम्हाला दिसेल शाहिदचे बालपण