आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Film Of Mine Break Sharukh Record, Salman Claim

माझा आगामी चित्रपट मोडेल शाहरुखचा विक्रम, सलमान खानचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इफ्तार पार्टीतील सलमान शाहरुखच्या गळाभेटीने सगळे काही ठीक झाले असे वाटले, पण सलमान मात्र हे विसरण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. आपल्या आगामी चित्रपटाद्वारे शाहरुखचा विक्रम मोडणार असल्याची वल्गना त्याने केली आहे.

शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसने (कमाई-225.67 कोटी) आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडल्याचेही मला माहीत आहे, पण मला एखाद्याविषयी तक्रार असेल, तर मी त्याला माझ्या कामातून उत्तर देईन, असे सलमान म्हणाला. आपला आगामी चित्रपट सगळ्यांना उत्तर देईल, असा दावा सलमानने एका टीव्ही शोच्या पत्रकार परिषदेत केला. मी शाहरुखची गळाभेट घेतली कारण तो रमजानचा पवित्र महिना असतो. या काळात आपण सर्वांबरोबर प्रेमाने वागत सर्वांनाच आनंदाने भेटतो. त्यामुळे मीही भेटलो, असे सलमान म्हणाला. शाहरुखची इच्छा असेल तर त्याला बिग बॉसमध्ये बोलावीन, असेही सलमानने स्पष्ट केले.