आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nikitan Dheer To Marry Rani Lakshmibai Aka Kritika Sengar

लक्ष्मीबाई अर्थातच कृतिकासह बोहल्यावर चढणार थंगाबली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई एक्स्प्रेस या सिनेमातील व्हिलेन थंगाबली अर्थातच अभिनेता निकितन धीरने यावर्षी रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. निकितनची जोडीदार छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा असून तिचे नाव कृतिका सेंगर आहे. महारानी लक्ष्मीबाई आणि पुनर्विवाह या लोकप्रिय मालिकांमध्ये कृतिका मेन लीडमध्ये झळकली होती.
निकितन अलीकडेच खतरों के खिलाडी 5 चे शुटिंग पूर्ण करुन भारतात परतला आहे. निकितनला भेटायला कृतिका केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) मध्येही गेली होती.
यावर्षी सप्टेंबर महिन्यात निकितन आणि कृतिका यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. अद्याप लग्नाची तारीख निश्चित झालेली नाहीये. मात्र सप्टेंबरमध्येच लग्न होणार हे ठरलेले असून दोघांच्याही घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. निकितन अभिनेते पंकज धीर यांचा मुलगा असून त्यांनीच या दोघांची भेट घडवून दिली. हळूहळू निकितन आणि कृतिका यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि आता या दोघांनीही आपल्या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा निर्णय घेतला आहे.