आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपेरी पडद्यावरील 'आई' निरुपा रॉयने केली देवाचीही भूमिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. सिनेमा मधील माँ ची आज जयंती आहे. 2004मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' सिनेमामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. निरुपा यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात 1946मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गुणसुंदरी' या गुजराती सिनेमामधून केली. 'हमारी मंजिल' या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
चला पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या ४थी पर्यंत शिकलेल्या आणि १५ व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या निरुपा रॉय यांची रंजक माहिती...