आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानमध्ये नाही स्टार्सचे नखरे, फ्लाइटची बघितली वाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात मुंबई एअरपोर्टवर एक अनोखे दृश्य बघायला मिळाले. झाले असे, की एअरपोर्टवर सलमान खान त्याच्या फ्लाइटची आतुरतेने वाट बघताना दिसला. फ्लाइटला उशीर झाल्याने त्याला बराच वेळ वाट बघत बसावे लागल्याचे सांगितले जात आहे.
सुत्राने सांगितल्यानुसार, सलमानला त्याच्या 'किक' सिनेमाच्या शुटिंगसाठी दिल्लीला जायचे होते. परंतु एअरपोर्टवर गेल्यानंतर त्याला समजले, की फ्लाइट उशीरा लँड होणार आहे. तेव्हा त्याने स्टार्ससारखे कोणतेही नखरे न दाखवता आणि खासगी विमान मागवण्यापेक्षा फ्लाइटची वाट बघणे पसंत केले. फिल्म इंडस्ट्रीच्या संबंधीत एका सुत्राने सांगितले, की सलमानमध्ये स्टार्ससारखे कोणतेच नखरे नाहीयेत. त्याने सांगितले, की जेव्हा त्याला प्रवास करण्यासाठी बिजनेस क्लासचे तिकीट उपलब्ध होत नाही तेव्हा तो इकोनॉमिक क्लासने प्रवास करतो.