आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा करणे आवडत नाही- रोहित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या वाईमध्ये आपल्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. या सिनेमात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. 14 मार्चला रोहितचा वाढदिवस होता. तो 39 वर्षांचा झाला. मात्र वाढदिवस साजरा करणे रोहितला आवडत नाही. तो म्हणाला की, मला नेहमी कामात व्यग्र राहणे आवडते. मी सगळ्याच दिवसांना सामान्य नजरेने पाहतो. वाढदिवस साजरा करणे मला आवडत नाही.

खरंतर रोहित आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. म्हणून त्याला वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. लहानपणी आणि तरुण वयातही कधीच वाढदिवस साजरा केला नसल्याचे त्याने सांगितले. मात्र प्रत्येक वाढदिवसाला माझी आई मला सर्वात प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. गेल्या काही वर्षांपासून चित्रीकरण स्थळावर ज्या-ज्या सिनेमाचे शूटिंग सुरू असते. त्यातील कलाकार मला कळू न देता सेटवरच माझा वाढदिवस साजरा करत असतात. त्यांना माहीत असते की, मला हे आवडत नाही त्यामुळे ते मला न सांगता वाढदिवसाची तयारी करतात.

तुला सर्वात जास्त काय आवडते? यावर तो म्हणाला की, मला लाँग ड्रायव्हिंग आवडते तेही माझ्या फेरारी गाडीने. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी ज्याही गोष्टी करण्याचे ठरवले आज ते मी सगळे करू शकलो.