आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बँग बँग'मध्ये स्वतः सगळे स्टंट्स करणार हृतिक रोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या शिमल्यात 'बँग बँग' या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरु आहे. या सिनेमात हृतिक रोशन मेन लीडमध्ये आहे. या सिनेमातील सर्व स्टंट्स बॉडी डबलचा वापर न करता हृतिक स्वतः करणार असल्याची बातमी आहे. सुरुवातीला बातमी होती, की ब्रेन सर्जरीमुळे हृतिक अॅक्शन सीन्स करणार नाही. यासाठी बॉडी डबलची व्यवस्थादेखील करण्यात आली होती.
मात्र आता सिनेमाच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, हृतिक शिमल्यात पोहोचल्यानंतर चित्रीत झालेल्या सीन्समुळे आनंदी नव्हता. त्यामुळे त्याने बॉडी डबलने केलेले सर्व अॅक्शन सीन्स स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सीन्स चित्रीत करताना बॉडी डबल सेटवर हजर राहणार आहेत.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, हृतिकचे सर्व अॅक्शन सीन्स एंडी आर्मस्ट्रॉग्ने डिझाइन केले आहेत. ते सध्या 'द अमेजिंग स्पायडरमॅन 2' या सिनेमावर काम करत आहेत.
हृतिकने यापूर्वी आपल्या सर्व सिनेमातील अॅक्शन सीन्स स्वतः केलेले आहेत. त्याला बॉडी डबलचा वापर करणे पसंत नाही. 'बँग बँग' हा सिनेमा 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा एक अॅक्शन सिनेमा आहे.