आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Bollywood\'s Wishes For SRK & Gauri Khan\'s Surrogate Baby?

शाहरुख आणि गौरीच्या सरोगेट बेबीला बॉलिवूडमधून नाही मिळाल्या शुभेच्छा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जेव्हा बॉलिवूड कपल आपल्या होणा-या बाळाची आतुरतेने वाट बघतात तेव्हा काय घडतं याचा जरा अंदाज बांधा. एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच बी टाऊनचे सर्व सेलिब्रिटी आपापल्या परीने होणा-या आई बाबांना शुभेच्छा देतात. इतकेच नाही तर होणा-या बाळासाठी संदेश आणि भेटवस्तूही पाठवल्या जातात.

जेव्हा बच्चन फॅमिलीमध्ये बाळाचे आगमन होणार होते, तेव्हा राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतर राष्ट्रीय स्तरावर त्या विषयी चर्चा झाली. जगभरातील वृत्तपत्र आणि मॅगझिन्समध्ये ऐश्वर्या आणि तिच्या होणा-या बाळाविषयी बातम्या प्रकाशित झाल्या. जेव्हा ऐश्वर्या आई झाली, तेव्हा ती एक ग्लोबल न्यूज बनली.

काजोलला आठवा महिना लागला होता, तेव्हा या अभिनेत्रीने एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला मुलाखत देऊन ही गोड बातमी जाहीर केली होती. या बातमीनंतर बॉलिवूडमधील तिच्या संपूर्ण मित्र-मैत्रिणींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सोशल नेटवर्किंग साईटवरसुद्धा काजोलला शुभेच्छा पाठवण्यात आल्या होत्या.

शिल्पा शेट्टीच्या बाळाबद्दलही अशीच उत्सुकता बॉलिवूडमध्ये दिसून आली होती. शिल्पाने तर आपल्या होणा-या बाळाचे एक ट्विटर अकाऊंटसुद्धा बनवले होते. ती या अकाऊंटवरुन आपल्या होणा-या बाळाविषयी ट्विट्स करायची.

इतकेच नाही तर सेलिना जेटलीसुद्धा ती प्रेग्नेंट असताना प्रसिद्धीझोतात होती. पीपल मॅगझिनने या अभिनेत्रीच्या जुळ्या मुलांची बातमी प्रकाशित केली होती.

मात्र यावेळी अवेटेड बेबीबद्दलची बॉलिवूडकरांमधील उत्सुकता कुठे गेली ? किंग खान ज्युनिअर 3 (शाहरुखच्या तिस-या बाळाला या नावाने संबोधले जाऊ शकते) लवकरच या जगात येणार आहे. मात्र अद्याप त्याच्यासाठी कुठूनही शुभेच्छा आलेल्या नाहीत. यावरुन शाहरुखच्या होणा-या मुलाबद्दल सेलिब्रिटी उत्सुक नाहीत, असंच दिसून येतंय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कोण होते बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेडे किड्स आणि त्यांचे पॅरेंट्स...