आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-अरबाजसोबत भांडण न झाल्याचे सोनाक्षीला द्यावे लागले स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांपासून बातम्या येत आहेत, की बॉलिवूड दबंग सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यामध्ये वाद झाला असून ते एकमेकांसोबत बोलतदेखील नाहीत. अशा बातम्या समोर येत असतानासुध्दा या दोन्ही स्टार्सनी मौन बाळगले होते. परंतु आता सोनाक्षी ते मौन तोडले आहे. हो खरचं, सोनाक्षीने या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे आणि या सर्व अफवा आहे असेही तिने सांगितले. सोनाक्षीच्या सांगण्यानुसार, सलमान आणि तिच्यामध्ये कोणताही वाद झालेला नसून दोघांमध्ये सर्व काही ठिक आहे.
सोनाक्षीने बॉलिवूड करिअरची सुरूवात सलमानसोबत 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दबंग' सिनेमातून केली होती. त्यानंतर तिने सलमानसोबत पुन्हा एकदा 2012मध्ये रिलीज झालेल्या 'दबंग 2'मध्ये काम केले होते. 'दबंग 2'नंतर अशा बातम्या यायला लागल्या होत्या, की सोनाक्षीचे अरबाज आणि सलमानसोबत भांडण झाले आहे.
सोनाक्षीने सलमानच्या 'डॉली की डोली' आणि 'किक' सिनेमासाठी जेव्हा नकार दिला, तेव्हा या बातम्या ख-या असल्याचेही मानले जात होते. सोनाक्षीने या सिनेमांना नकार दिल्यानंतर सलमानच्या 'डॉली की डोली'मध्ये सोनम कपूर आणि 'किक' सिनेमात जॅकलिन फर्नांडिसला घेण्यात आले आहे.
आता सोनाक्षी म्हणतेय, की सलमान आणि तिच्यामध्ये कोणताच वाद झालेला नाहीये आणि तिने या गोष्टीचे स्पष्टीकरण टि्वटरवर दिले आहे. सोनाक्षीने टि्वट केले, 'सलमान आणि अरबाजसोबत माझा कोणताही वाद नसून आमच्यात सर्वकाही ठिक आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये.'
असो, सलमान आणि सोनाक्षी यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहोत आणि दोघेही लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसावेत हीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
पुढे वाचा सोनाक्षी 2014मध्ये कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे...