आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार पदाची आताच घाई नको - रणबीर कपूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा ‘सांवरिया’ हा चित्रपट पदार्पणात फ्लॉप झाल्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटांपर्यंत सलग हिट चित्रपट देणा-या व अभिनेता म्हणून ख्यातीप्राप्त झालेल्या रणबीर कपूरला पुढचा सुपरस्टार म्हणणे मुळीच आवडत नाही. याबाबत त्यानेच एका मुलाखतीत ही माहिती दिली.


या वेळी तो म्हणाला, बॉलीवूडमध्ये मी कोणावर मात करण्यासाठी आलो नाही. चित्रपटात काम करून आपले नाव कायम चलतीत ठेवण्याचा केवळ उद्देश आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करून केवळ पाच वर्षे झाली आहेत. त्यामुळे माझ्या नावावर ‘पुढील सुपरस्टार’ असा शिक्का आताच मारणे योग्य नाही. माझ्या मागून येऊन कोणीही हा किताब आपल्या नावावर करू शकतो. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्याबरोबर तुलना योग्य नाही. तिघेही गेल्या 25 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सातत्याने काम करत आहेत. मी आता कुठे पाच वर्षे इंड्रस्टीत पूर्ण केली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तुलना केल्याने आपल्याला वाईट वाटत असल्याचेही तो म्हणाला. रणबीरने 2007 मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. हा चित्रपट
सुपरफ्लॉप झाला होता.


आई-वडिलांसोबत ‘बेशरम’मध्ये भूमिका
रणबीर सध्या अभिनव कश्यप यांच्या ‘बेशरम’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच त्याच्यासोबत आई नीतू आणि वडील ऋषी कपूर काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता लागली.