आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Motherhood Plans For Next 5 Years,says Kareena Kapoor

पुढील पाच वर्षे हलणार नाही सैफच्या घरी पाळणा, करीनाने केले स्पष्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांत करीना मीडियासमोर आली नव्हती. त्यामुळे एक संशय व्यक्त केला गेला होता, की ती कदाचित प्रेग्नेंट असावी. दरम्यान एका कार्यक्रमात करीना साडी नेसून आल्यानंतर, मनोरंजन जगतातील पत्रकारांनी कुजबूज सुरू केली. मात्र यावेळी करीनाने या गोष्टीचा इन्कार करुन स्पष्ट केले, की पुढील पाच वर्षे तरी सैफच्या घरी पाळणा हलणार नाही.
करीना म्हणाली, की पुढील पाच वर्षे माझा आई होण्याचा विचार नाहीये, तसेच सैफलाही हे मनापासून मान्य असल्याचं तिने सर्वांना सांगितलं.
खरं म्हणजे करीना जेव्हा यावर्षी कोणत्याही अवॉर्ड समारोहात दिसत नव्हती, यावरून ही चर्चा सुरू झाली. मात्र पैसे मिळाले तरंच मी एखाद्या कार्यक्रमात परफॉर्म करते असं करीनाने बोलून दाखवलं. इतक्यात आई होण्याचा आपला विचार नाही हे स्पष्ट करण्यासाठी करीनाने आपली 'सिंघम 2' च्या शुटिंगसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचं सांगितलं. 2014 मध्ये येणाऱ्या या 'सिंघम 2' साठी आपण यापेक्षा अधिक फीट असणार असल्याचं यावेळी करीनाने बोलून दाखवलं.