आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No One Is Above The Law Says Aamir On Sanjay Dutt

\'कायद्यापेक्षा व्यक्ती मोठा नाही\', संजयच्या पॅरोलवर आमीर खानचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्तच्या पॅरोलवर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी कायद्याच्या आधारे पॅरोल मिळत असल्याचे वारंवार सांगत आहेत तर, दुसरीकडे विरोधीपक्ष त्याला वारंवार मिळत असलेल्या पॅरोलवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. मात्र, अभिनेता संजय दत्त ज्या बॉलिवूडचे प्रतिनिधीत्व करीत आहे, त्यांनी यावर आतापर्यंत तोंडवर बोट अशी भूमिका घेतली होती. ती आज बॉलिवूडने तोडली आहे.
अभिनेता अमिर खानला याविषयी विचारले असता त्याने सांगितले, 'मला नाही वाटतं याविषयावर मी माझे मत मांडणे योग्य आहे. याचे अनेक कारण आहेत. मी याविषय पूर्णत: अज्ञानी आहे. मला माहितीये तुरूंगाचे वेगळे नियम आणि कायदे असतात आणि त्याचे संजयने पालन करायला हवे. मला वाटते ते नियम सर्वांसाठी सारखे असतात आणि संजयनेही त्याचे पालन करायला हवे. जर त्यांचे पालन होत नसेल तर त्यासाठी अधिकारी जबाबदार आहेत. फक्त संजयच्याच प्रकरणात नव्हे तर प्रत्येकावर कारवाई व्हायला हवी. कुणीच कायद्यांपेक्षा मोठा नाहीये. मला संजयच्या प्रकरणाबद्दल नाही माहीत त्याला किती दिवसांची पॅरोल दिले आहे आणि त्याने ते कशी मिळवले आहे. म्हणून यावर माझे मत मांडणे मला योग्य वाटत नाही.'
संजयच्या पॅरोलमध्ये पुन्हा एकदा मुदत वाढ करून ती 21 मार्चपर्यंत केली आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारकडून याविषयी अहवाल मागवला आहे, की कोणत्या आधारावर संजयला वारंवार पॅरोल मिळत आहे. संजयला आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. परंतु तो 21 डिसेंबर 2013पासून तुरूंगाबाहेर आहे.
आमिरला जेव्हा 'सत्यमेव जयते 2' विषयी विचारले तेव्हा शोविषयी सांगताना त्याला रडू कोसळले. त्याने सांगितले,
'सत्यमेव जयते 2' शोच्या प्रत्येक एपिसोडवेळी तो 15-20 मिनीट रडला. परंतु त्यातील काही भाग काढून टाकण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा आमिरने सांगितले 'सत्यमेव जयते'मुळे बदलले त्याचे आयुष्य?