आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not See To Juhi As Competator, Madhuri Expressed Her Feeling

जुहीकडे स्पर्धक म्हणून पाहिले नव्हते, माधुरीने व्यक्त केल्या आपल्या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूडमध्ये जुही आणि मी अनेक वर्षे काम करत आहोत; परंतु रुपेरी पडदा शेअर करण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. तो काळ अभिनेत्रींमधील स्पर्धेचा होता. मात्र, संपूर्ण करिअरमध्ये जुहीकडे स्पर्धक म्हणून कधीही पाहिले नाही, अशा शब्दांत अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बॉलिवूडचा तो काळ म्हणजे अभिनेत्रींमध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येत असे; परंतु जुहीसोबत काम करता येईल, असे मात्र कधीच वाटले नव्हते. ही गोष्ट 7 मार्च रोजी ‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनातून प्रत्यक्षात येणार आहे, असे माधुरीने सांगितले.
एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या कारकीर्दीबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. खरे तर एखाद्या व्यक्तीसोबत काम करताना माझ्या मनात कसलाही पूर्वग्रह नसतो. हीच माझी विचारसरणी आहे. दोन अभिनेत्रींचा समावेश असलेल्या चित्रपटात मी कधी काम केले नाही, असे नाही. या अगोदर प्रीती झिंटा (ये रास्ते हैं प्यार के), ऐश्वर्या राय-बच्चन (देवदास), करिश्मा कपूर (दिल तो पागल है) यांच्यासोबत काम केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा जुहीविषयी आणखी काय म्हणाली माधुरी...