आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Shahrukh Khan Aamir Khan Will Paly Lead Role In Shuddi

हृतिक किंवा शाहरुख नव्हे, आता आमिर करणार 'शुध्दी'मध्ये काम?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आश्चर्यचकीत करणारी बातमी आत्ताच समोर आली आहे. आमिर खान करण जोहरच्या 'शुध्दी'ची पटकथी वाचत आहे. 'शुध्दी' किंवा अन्य एखाद्या सिनेमाची तो लवकरच निवड करणार असल्याचे सांगितले जात आहे. आमिर खान 'सत्यमेव जयते'च्या शुटिंग आणि प्रमोशनसोबतच दोन महत्वपूर्ण आणि मोठ्या सिनेमांच्या पटकथा वाचत आहे. त्यातील एक आहे, 'शुध्दी' आणि दुसरी फरहान अख्तरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमाची पटकथा आहे.
हृतिक रोशनने 'शुध्दी'ला नकार दिल्यानंतर अंदाज व्यक्त केले जात होते, की करण जोहर त्याच्या लकी मास्टर शाहरुख खानला या सिनेमात घेणार आहे. करणने टि्वटरवरसुध्दा सिनेमाची रिलीज तारीख डिसेंबर 2015 घोषित केली होती. परंतु सिनेमाच्या कलाकारांचे नाव त्याने स्पष्ट केले नाही. कारण करणाचा हा सिनेमा प्रत्येकवेळी वेगळे वळण घेत आहे. आता आमिर 'शुध्दी'ची पटकथा वाचत आहे, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत.
मागील वर्षी 'धूम 3'सोबत आमिरने राजकुमार हिरानीच्या 'पीके' सिनेमाची शुटिंगदेखील सुरू केली होती. 'पीके' या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. परंतु या सिनेमानंतर आमिरने अद्याप कोणताच सिनेमा साइन केलेला नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या याविषयी अधिक माहिती...