आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफ-करीनाचे लग्न आहे की, बिरबलाची खिचडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे छोटे नवाब अर्थात सैफ अली खानला लग्न करणे म्हणजे भातुकलीचा खेळ वाटत आहे. सैफने परत एकदा आपल्या लग्नाचे ठिकाण आणि तारीख बदलली आहे. पहिल्यांदा पतौडी निवास, नंतर लंडन, काही दिवसांपूर्वी मालदीव अशा अनेक ठिकाणांची नावे त्याने यापूर्वी सांगितली आहेत. पण आता ब्राझीलमध्ये सैफ आणि करीनाचे लग्न पार पडणार आहे.
एका मुलखतीत सैफने सांगितले की, "आम्ही ब्राझीलमधील 'रियो डी जनेरियो' या ठिकाणी लग्न करणार आहोत. लग्न नोव्हेंबरमध्येच होईल." लग्नाच्याबाबतीत सैफने नवीन ठिकाण सांगितल्यानंतर सर्वजण थोडे गोंधळून गेले. सैफला परत एकदा विचारले गेले की, या वेळेस तू लग्नाच्या बाबतीत नक्की गंभीर आहेस ना? तेव्हा सैफने उत्तर दिले "हो, यावेळेस मी गंभीर आहे, तुम्ही बिनधास्तपणे ही बातमी छापा."
आता तर असे वाटत आहे की, त्यांचे लग्न होईपर्यंत 'तारीख पे तारीख' आणि ठिकाण बदलतच राहणार आहे. काही दिवसांपूर्वी सैफने सांगितले होते की, लग्न मालदीवमध्ये १०० लोकांच्या उपस्थितीत होणार. सैफची आई शर्मिला टागोर यांनी लग्नाची तारीख १६ आक्टोबर सांगितली होती.