आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओम पुरी यांना दिलासा; 30 पर्यंत अटक टळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल असलेले अभिनेते ओम पुरी यांना 30 ऑगस्टपर्यंत अटक करू नये, असे निर्देश सत्र न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिले. न्यायाधीश डी. ए ढोकलिया यांच्यासमोर सुनावणी झाली. यापूर्वीच पुरी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. जामीन काळात दररोज पोलिसांत हजर राहून त्यांना सहकार्य करावे, असेही न्यायालयाने पुरी यांना बजावले.


22 ऑगस्ट रोजी पुरी यांनी आपल्याला काठीने मारहाण केल्याचा आरोप करून पत्नी नंदीता यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पुरींवर कौटुंबिक छळप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.