आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरीच्या ‘द हंड्रेड फूट जर्नी’ला ब्रेक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अलीकडेच ओम पुरी यांना हॉलिवूड चित्रपट ‘द हंड्रेड फूट जर्नी’ चा प्रस्ताव मिळाला होता. चित्रपटासाठी उत्सुक असलेले ओम लवकरच चित्रीकरणासाठी जाणार होते, मात्र घरगुती हिंसाचार कायद्यात अडकल्यामुळे ओम यांचे जाणे शक्य दिसत नाही.

रॉलँड जॉफ यांच्या ‘सिटी ऑफ जॉय’ वेळी 1993 मध्ये नंदिता पुरी यांची ओम पुरीसोबत पत्रकार म्हणून पहिली भेट झाली होती. ओमचा हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट होता. येथेच त्यांना दुसरा इंग्रजी चित्रपटदेखील मिळाला होता. मात्र, आता घरगुती वादामुळे त्यांच्या हातून हा चित्रपट जाऊ शकतो.

ओम पुरी यांनी आपल्याला काठीने मारझोड केल्याची तक्रार नंदिता यांनी केली आहे. त्यामुळे ओम यांना रोज पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागत आहे. दुसरीकडे ‘द हंड्रेड फूट जर्नी’ ची शूटिंग सप्टेंबरपासून सुरू होणार होती. यासाठी ओम युरोपला जाणार होते. ते आणखी काही दिवस गेले नाही तर ही भूमिका दुसर्‍या भारतीय अभिनेत्याकडे जाऊ शकते. चित्रपटाचे दिग्दर्शन लास हॅलस्ट्रॉम करणार आहेत. ‘माय लाइफ अँज अ डॉग’ आणि ‘द सिडार हाऊस रुल्स’ या दोन चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट डायरेक्टरचे नामांकन मिळालेले आहे. ‘द हंड्रेड.’ ची निर्मिती स्टीवन स्पीलबर्ग आणि ओपरा विनफ्रे करत आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.