आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osacar Award : 'The Good Road' Race With Other World Films

ऑस्कर पुरस्कार : ‘द गुड रोड ’ची पाऊणशे चित्रपटांशी टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिल्स - भारताचा गुजराती चित्रपट ‘द गुड रोड’ ला ऑस्कर शर्यतीत अनेक तगड्या चित्रपटांचा मुकाबला करावा लागणार आहे. ग्यान कोरिआ यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला-वहिला चित्रपट ऑस्कर वारीवर गेला असून त्याचा परदेशी भाषा गटात 76 चित्रपटांत समावेश झाला आहे.


86 व्या अकादमी पुरस्कारासाठी ‘द गुड रोड’ भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. यात एका हरवणा-या व नंतर सापडणा-या मुलाची कथा मांडण्यात आली आहे. ‘द लंचबॉक्स’ ला डावलून या चित्रपटाची निवड झाल्यामुळे भारतात काही दिवस वाद चालला होता. ‘लंचबॉक्स’ चित्रपटाला अनेक गाजलेल्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे त्याची निवड अपेक्षित असताना भारताकडून ‘द गुड रोड’ला नामांकन देण्यात आल्याने नाराजी व्यक्त झाली होती. अफगाणिस्तानचा ‘वाज्मा : अ‍ॅन अफगाण लव्ह स्टोरी’ हा बारमाक अक्रम यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्याशिवाय अर्जेंटिनाकडून ‘द जर्मन डॉक्टर’, फ्रान्सचा ‘रिनॉएर’देखील परदेशी चित्रपटांच्या विभागात स्पर्धेत आहेत. ‘इप मॅन ’(हाँगकाँग), ‘बॅक टू 1942 ’(चीन), ‘द ग्रेट पॅसेज ’(जपान) असे चित्रपट परदेशी भाषा विभागात दाखल झाले आहेत. ऑस्करचे नामांकन 16 जानेवारी 2014 रोजी जाहीर होणार आहेत. पुरस्कार सोहळा 2 मार्च 2014 ला होईल.