आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरची नवी हिरोइन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 'बेशरम' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत पल्लवी शारदा नावाची एक नवीन हिरोइन दिसणार आहे. अभिनव कश्यप हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून किशोर कुमार यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे. अभिनवने या सिनेमाची तयारी सुरु केली असून रणबीरचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांनाही या सिनेमासाठी साइन करण्यात आले आहे.

याआधी पल्लवी करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’मध्ये एका दृश्यात झळकली होती, तर ‘दस तोला’ सिनेमात ती मनोज वाजपेयीची हिरोइन होती. पल्लवी रणबीरची हिरोइन बनल्यामुळे खूप खुश आहे. ती म्हणते, ‘बेशरम’मध्ये मी मुख्य भूमिका करत आहे. मात्र मी माझ्या भूमिकेविषयी काही सांगू शकणार नाही. रणबीर कपूरसोबत काम मिळाल्याने मी खूप खुश आहे.’

पल्लवीने सांगितले की, तिचे आई-वडील दोघेही उच्च शिक्षित आहेत. 1980 मध्ये ते ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले होते. पल्लवीने लॉ आणि जर्नालिझममध्ये पदवी मिळवली आहे. 2010 ला तिने ‘मिस ऑस्ट्रेलिया’चा किताबसुद्धा जिंकला आहे. ती जास्तीत जास्त वेळ भरतनाट्यम करण्यात घालवते. पल्लवीचा ‘सेव्ह युअर लेगस’ नावाचा एक ऑस्ट्रेलियन सिनेमा फेब्रुवारीमध्ये रिलीज होत आहे. यात ती स्टीफन करीसोबत मुख्य भूमिकेत आहे.